येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...
मला वाटतं, आहे. चराचर सृष्टीचा भाग आहे मी, त्यामुळे बंधुभावही मला महत्त्वाचा वाटतो. अगदी मानवी व्यवहार तपासताना, तशा व्यवहारांत भाग घेताना केंद्रस्थानी ठेवण्याइतका महत्त्वाचा वाटतो. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्यं एखाद्या समाजात मूर्त कशी करावी, हे भारतीय संविधान सांगू पाहतं. लोक विचारतात ना कधीतरी, “तुमच्या लेखनामागची प्रेरणा काय?” तर काय सांगायचं?.......